मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख आहे. कोणत्याही चॅनलवरून किंवा बाहेर राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर चुकीचे बोलणे जात असेल तर तो राज्याचा अपमान आहे. हा अपमान तुमचा आणि आमचा सुद्धा आहे.अशा शब्दांत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेत्यांना बजावले.
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांच्याबद्दल असं कुणी बोललं तर तो सुद्धा राज्याचा अपमान होता. कुणी जर राज्याच्या राजधानीची तुलना पाकव्याप्त भागाशी करत असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आम्ही याच्या विरोधात एकत्र आले पाहिजे’, अशा शब्दांत नाना पटोले यांनी सुधीर मुनगंटीवार यांची कानउघडणी केली आहे.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात हिंदु पेपरने काही बातमी केली होती. त्यावर तुम्ही हक्कभंगाची नोटीस काढली होती. तसंच सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्लाही दिला होता’, असंही नाना पटोले यांनी मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिले.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (maharashtra winter assembly session 2020) दुसऱ्या दिवसालाही वादळी सुरुवात झाली आहे. हक्कभंग सादर करण्यावरून भाजपने जोरदार आक्षेप घेतला त्यावेळी नाना पटोले बोलत होते.