पहिल्यापासून औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्याला विरोध करणाऱ्या काॅंग्रेसवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. औरंगजेबाचा सरळ संबंध छ. संभाजी महाराज्यांच्या वधाशी जोडला गेला आहे. असा औरंगाजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं सेक्युलर नव्हे”, असा मार्मिक टोला संजय राऊत यांनी काॅंग्रेसला लगावला.
राऊतांनी इतिहासाचे दाखले देत काॅंग्रेसवर टीका केली आहे. राऊत म्हणतात की, “अल्पसंख्यांक व्होट बॅंकेवर व स्वतःच्या सेक्यूलर प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, म्हणून काॅंग्रेसने औरंगाबादचं संभाजीनगर होऊ नये अशी भूमिका घेतली आहे. काॅंग्रेसची भूमिका काहीही असली तरी, औंरगजेबाच्या खुणा निदान महाराष्ट्रात तरी ठेवू नयेत, या मतांचा मोठा वर्ग आहे”, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
त्यानं शिवाजीराजांना शत्रू मानलंच, पण छत्रपती संभाजींना हालहाल करून मारलं, अशा औरंगजेबाच्या नावानं महाराष्ट्रात तरी एखादं शहर असू नये, हीच शिवभक्ती आहे”, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.दै. सामनातील लेखात राऊतांनी सरळ औरंगबाद नामांतराच्या मुद्द्याला हात घातला.