औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी एक प्रसिद्धीपत्रक ट्विट केले आहे. “औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडत आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहेत. काँग्रेसने आपली भूमिका याआधीच स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
यातच औरंगजेब हा अत्यंत दुष्ट राजा होता. मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम वाटत नाही, असे विधान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. तसेच, औरंगाबादचे नामांतर हा अस्मितेचा प्रश्न आहे. औरंगाबादचे नामांतर झाल्यास आपली मुस्लीम मते जातील, हा गैरसमज काँग्रेस पक्षाने मनातून काढून टाकावा, असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे
यावेळी “बाळासाहेब थोरात यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत. त्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, औरंगजेब दुष्ट राजा होता. मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम नाही. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतरामुळे मुस्लीम व्होट बँकेला धक्का बसण्याची भीती काँग्रेसने बाळगू नये,” असे चंद्रकांत खैरे म्हणाले.चंद्रकांत खैरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते.