अमित शाह यांनी रविवारी शिवसेनेवर सणसणीत टीका केली . भाजप शिवसेनेच्या वाटेवर चालली असती तर शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती, असा घणाघात अमित शाहंनी केला. ज्यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेना संपुष्टात आली असती म्हणणाऱ्यांना कशा प्रकारे या पक्षानं वास्तविकतेचा चेहरा दाखवला याचं प्रमाण दिलं. ‘1975 मध्ये रजनी पटेल यांनी अशाच आशयाचं वक्तव्य केलं होतं की शिवसेना संपली. पुन्हा 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही असंच काहीसं म्हटलं. पण, या दोन्हीही प्रसंगी शिवसेना आधीपेक्षा जास्त ताकदीनं उभी राहिली’, असं राऊतांनी ट्विट करत शाहंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर केलं. जय महाराष्ट्र! लिहित त्यांनी आपल्या उत्तराला अधिक जोर दिला.
थेट शिवसेनेच्या अस्तित्वाबाबत दावा करणाऱ्या शाहंना अखेर शिवसेनेकडून सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे.तीन चाकी सरकारची चाकं तीन दिशेला आहेत’, असं म्हणत शिवसेना आणि महाविकासआघाडीवर शहांनी निशाणा साधला आहे.