ऑनलाईन बुकींग केल्यास, पंढरपुरातील विठोबा उद्यापासून १ हजार भक्तांना देणार दर्शन

2

उद्या राज्यातील मंदिरं उघडणार असल्याचं राज्य शासनाने जाहीर केलं आहे. ठाकरे सरकारच्या दिवाळी गिफ्टमुळे भक्तांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे. पण मंदिरं खुली नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. सरकारच्या गाडलाइन्स लक्षात घेत पंढरपूर मंदिरही आता भाविकांसाठी खुलं होणार आहे. त्यामुळे विठ्ठल भक्तांमध्ये उत्साह पसरला आहे. पंढरपूर मधील पांडुरंग भक्तांसाठी खुला होत आहे.

विठ्ठल दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करावी लागणार आहे. पंढरपूरात दररोज एक हजार भाविकांना दर्शन दिलं जाणार असल्याची माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 65 वर्षावरील व्यक्ती आणि 10 वर्षापर्यंतच्या मुलांना दर्शनास बंदी असणार आहे. नित्योपचाराचा वेळ वगळता उरलेल्या वेळात दर एक तासाला शंभर लोकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येईल. असा निर्यम मंदिर प्रशानसनाकडून घेण्यात आला आहे.