मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत : संजय राऊत

12

मंगळवारी वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे मोठी गर्दी जमली होती. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत, असे वक्तव्यही संजय राऊत यांनी केलं आहे.

एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट असताना ही गर्दी पाहायला मिळाली. कोरोनाची परिस्थिती पाहता जमलेली गर्दी गंभीर होती. त्यामुळे संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. 

मुख्यमंत्री हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. काल जमलेल्या गर्दीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.