धनंजय मुंडे खोटे असते तर, राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया

154

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रेणू शर्मा नामक महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. सदरील तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिलं आहे. फेसबुक पोस्ट मध्ये अनेक धक्कादायक खुलासे धनंजय मुंडे यांनी केल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.

आत्तापर्यंत अनेक नेत्यांनी मुंडे प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या आता राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवार यांनीही आपली प्रतिक्रिया एका मराठी वृत्तवाहिनीला बोलतांना दिली आहे. ते म्हणाले की, धनंजय मुंडे खोटे असते तर ते व्यक्त झाले नसते. ते व्यक्त होत आहेत त्यावरून समजून घ्या की ते किती प्रामाणिक आहेत. आणि अशा व्यक्तींसोबत कोणी षडयंत्र रचत असेल तर त्याच्या खोलात जाण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. त्यावर ते स्वतः प्रतिक्रिया देत आहेत. सोबत पोलीस प्रशासन योग्य तो तपास करत आहे. त्यामुळे तपास होईपर्यंत बोलणं योग नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण काही जाणकार म्हणतात की मुंडे साहेबांचा नाव खराब करण्याचा प्रयत्न आहे की काय ? किंवा वेगळ्या पद्धतीने काही लोकं ब्लॅक मेलिंग करत आहेत की काय ? असा अंदाजही वर्तवत असल्याचं रोहित पवार म्हणाले.