‘मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते’; शिवसेना आमदाराचा हल्लाबोल

200


राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोना संकटात राजकारण करत असल्याचा त्यांच्यावर वेळोवेळी आरोप होत आहे. आता शिवसेनेच्या आमदाराने फडणवीसांवर जहरी टीका केली आहे. मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. 

फडणवीसांनी कोरोनावरुन राजकारण करु नये, असा दम त्यांनी दिला. ते शनिवारी बुलडाण्यात एक मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. यावेळी संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला.  भरसभेत देवेंद्र फडणवी यांच्याबाबतीत संजय गायकवाड यांची जीभ घसरली. त्यामुळे आता यावरुन मोठा राजकीय वाद होण्याची शक्यता आहे.

एकीकडे राज्यात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. मात्र, विरोधी पक्ष यावेळी मदत करायचे सोडून राजकारण करत आहे, असा आरोप बुलडाणा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केला.

बोलताना आमदार गायकवाड यांनी एकेरी भाषेचा वापर करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांच्यावर यथेच्छ टीका केली आहे.