‘मी वेळीच सावध झालो नसतो तर माझाही मुंडे; ‘ह्या’ नेत्याच्या मागे लागली होती रेणू शर्मा

339

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रेणू शर्मा नामक महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. सदरील तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिलं होतं. या फेसबुक पोस्ट मध्ये अनेक धक्कादायक खुलासे धनंजय मुंडे यांनी केल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

‘२००८ सालात मी वेळीच सावध झालो नसतो तर माझाही धनंजय मुंडे झाला असता’ असा खळबळजनक खुलासा मनसे नेते मनीष धुरी यांनी केला आहे. २००८-९ च्या सालात रेणू शर्मा या महिलेने माझा नंबर मिळवून माझ्याशी संपर्क केला होता. नुकत्याच स्थापन झालेल्या पक्षाचा विभाग अध्यक्ष असल्याने नागरिक संपर्क करतात असा माझा समज होता. मात्र, या महिलेने माझ्याशी चुकीचे संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला.’ असं धुरी यांनी म्हटलं आहे.

‘माझ्याशी जवळीक साधून मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न या महिलेने केला. मी वेळीच सावध झालो होतो. विषय महिलेशी निगडित असल्याने मी तक्रार केली नाही. मात्र, आता मीही रीतसर तक्रार करणार आहे.’ असा खुलासा धुरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.