महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता : निलेश राणे

16

राणे पिता पुत्र आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यातील शाब्दिक सुद्ध सर्वश्रुत आहे. एकमेकांना प्रतिउत्तर दिल्याशिवाय दोन्ही नेत्यांना चैन पडत नाही. आता तुम्हीच बघा ना…

‘राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थितीत केला आहे. तसंच,’श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधले जात आहे.

चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड 2024चा निवडणूक प्रचार आहे. रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हा तरी थांबवायलाच हवा’ असा सल्लावजा टोला सामना या मुखपत्रातून भाजपला लगवण्यात आला आहे.

यावर भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ‘लाज सोडली शिवसेनेनी… शिवसेनेने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्य भर फक्त वापर केला. महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता. ज्यांचं घर वर्गणीतून चालतं तेच विचारतायत मंदिर वर्गणीतून बांधणार काय. जनाची नाही पण किमान मनाची तर ठेवा’. असा टोकाची टीका निलेश राणे यांनी केली आहे.