एमपीएससी ठरल्या वेळेत न झाल्यास …… पडळकरांचा ठाकरे सरकारला गंभीर ईशारा!

7

राज्य लोकसेवा आयोगाने एपमीएसी परिक्षांची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी बहुतांश जिल्ह्यांमध्ये महत्वांच्या मार्गावर ठिय्या देऊन या निर्णताचा निषेध नोंदवला. पुण्यात मोठ्यप्रमाणत विद्यार्थ्यांनी जमाव केला होता. यावेळीच भाजपनेसुद्धा विद्यार्थ्यांच्या या भूमिकेस पाठींबा दिला. धनगर समाजाचे नेते तसेच आ. गोपीचंद पडळकर यांनी विद्यार्थ्यांसोबत ठिय्या देत या निर्णयाचा धिक्कार केला.

मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरव यांनी तातडीची बैठक घेऊन २१ मार्च ही तारीख आज जाहीर केली।यानंतर पुन्हा पडळकरांनी ठाकरे सरकारवर हल्ला बोलत निर्वाणीचा ईशारा दिला. २१ मार्चला परिक्षा न झ‍ाल्यास वर्षा निवासस्थानासमोर ऊपोषणाला बसणार असा ईशारा ठाकरे सरकारला त्यांनी दिला आहे.

केंद्र सरकारच्या, रेल्वेच्या सगळ्या परिक्षा होत असतांना एमपीएसीसाठीच कोरोनाचे कारण का समोर केले जाते असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी ऊपस्थित केला. तसेच सलग पाचव्यांदा तारीख पुढे ढकलली गेल्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला होता.

पुण्यामध्ये मोठ्यासंख्येने विद्यार्थी जमले होते. यावेळी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बळाचासुद्धा वापर केला. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला जातो, विद्यार्थी काय लादेन समर्थक आहेत का? असा संतप्त सवालसुद्धा त्यांनी यावेळी विचारला.