माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी उद्याच राजीनामा देतो : संभाजीराजे छत्रपती

25

मराठा समाजाची भूमिका आणि समाजाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण राज्यातील काही भागांचा दौरा करणार आहोत, असं खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं आहे.मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यांनी राज्य दौरा सुरु केला असून आज ते सोलापुरात होते. यावेळी ते बोलत होते.

माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी उद्याच राजीनामा देतो, अशी उद्विग्न प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. तसेच मराठा आरक्षण प्रश्नाविषयी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली जाईल, असंही ते म्हणाले.

राज्य आणि केंद्र सरकारने काय भूमिका घ्यायची ते पहावे लागेल. सारथी संस्थेची दुरवस्था किंवा वसतिगृहाचे प्रश्न प्रलंबित आहेत त्याचे काम राज्याने करावे, असंही खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.