कर नहीं तो डर किस बात का ? क्या दाल मे कुछ काला है ? राम कदमांचा संजय राऊत यांना सवाल

6

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडी ने नोटीस बजावली आहे. पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचं वृत्त माध्यमांनी दिलंय.

भाजपला सोडचिट्ठी देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना एका भूखंड खरेदी प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे. तर संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठविल्याच्या बातम्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

थोड्याच वेळापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला.’मी ईडीच्या नोटिशीबद्दल काहीच सांगत नाही. भाजपचे नेतेच ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. त्यांच्याकडे जास्त माहिती आहे. त्यामुळे मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवला आहे. ईडीची नोटीस कदाचित तिथे अडकली असेल,’ असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, भाजपने मात्र या मुद्द्यावरून राऊत यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी देखील राऊत यांच्यावर निशाणा साधला. कर नहीं तो डर किस बात का ? क्या दाल मे कुछ काला है ? असा सवाल त्यांनी ट्विटरवर उपस्थित केला.