३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधाच्या परिणामांचे अवलोकन करून पुढील धोरण स्वीकारले जाईल, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भुजबळ उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नाशिक शहर आणि जिल्ह्यामधील कोरोना उपाययोजनांच्या आढाव्यासंदर्भात आज यंत्रणांची बैठक होईल. मागील बैठकीत ठरल्याप्रमाणे यंत्रणांचा आढावा घेण्यात येईल.
कडक निर्बंधाची नियमावली सोमवारी सरकारतर्फे जारी केली जाईल. जमावबंदीचा १४४ चा आदेश लागू होईल. कारखाने, जीवनावश्यक वस्तूंचे व्यवसाय सुरू राहतील. मात्र, शारीरिक अंतर पाळणे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, लसीकरण करणे बंधनकारक राहील.
राज्यात लॉकडाउन लागू होणार नाही. त्याऐवजी ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू राहतील. त्याची अंमलबजावणी सोमवारी (ता. ५) मध्यरात्री बारापासून सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.