“संजय राठोड यांचा राजिनामा घेतल्यास बंजारा समाजाचा ऊद्रेक होऊ शकतो” महंत सुनिलदास महाराजांचा ईशारा…..

21

“अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सरकारने वनमंत्री संजय राठोड यांचा राजिनामा घ्यावा अन्यथा आम्ही कामकाज होऊ देणार नाही” अशी भूमिका भाजपने घेतली आहे. संजय राठोड यांचा राजिनामा घ्यावा याकरिता शिवसेनेवर भाजपच नाही महाविकासअाघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमधील काही नेतेसुद्धा दबाव आणत असल्याच्या चर्चा आहेत. परंतू बंजारा समाजातील प्रतिष्ठित मानले जाणारे महंत सुनिलदास महाराजांनी मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजिनामा स्विकारु नये असे आवाहन केले आहे. तसेच राजिनामा स्विकारल्यास समाजाचा ऊद्रेक होऊ शकतो आणि त्यास सर्वस्वी भाजप जवाबदार असेन असा निर्वाणीचा ईशारासुद्धा दिला आहे.

संजय राठोड मुख्यमंत्री यांची भेट घेण्याकरिता मुंबई येथील निवासस्थानी गेले आहेत. मात्र संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय राजिनामा स्विकारु नये अशी मागणी महंत सुनिल दास यांनी मुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हान यांचेकडे केली आहे. संपूर्ण चौकशीनंतर जे तथ्य समोर येईल त्या आधारवर कारवाई करण्यात यावी. राजिनामा स्विकारण्याची घाई करु नये असे महंत सुनिलदास यांनी म्हटले आहे.

बंजारा समाज सर्वशक्तीनिशी संजय राठोड यांच्या पाठीशी आहे. नुकतेच वाशिम येथील पोहरादेवी याठिकाणी त्यांच्या समर्थकांनी केलेल्या गर्दीवरुन याची प्रचिती येते. या पार्श्वभूमिवरच संजय राठोड यांचा राजिनामा स्विकारल्यास बंजारा समाजाचा ऊद्रेक होऊ शकतो. आणि या ऊद्रेकास पूर्णत: भाजप जवाबदार असेन असेसुद्धा महंत सुनिलदास यावेळी म्हणाले.

पुजा चव्हान या तरुणीच्या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या अॉडिअो क्लीपमुळे थेट संजय राठोड यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर अनेक गोष्टी घडत गेल्या ज्यामध्ये संजय राठोड यांच्यावरील संशय वाढतच गेला. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. तसेच मुख्यमंत्री आज संजय राठोड यांचा राजिनामा घेणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याचेसुद्धा बोलले जात आहे.