“शिवसेनेत मतदान केल्यास ऊद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपण राहणार नाही” ठाकरेंवर या नेत्याची बोचरी टीका

32

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकारलाच खडे बोल सुनावले आहे. यावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरेंवर निशाना साधला आहे. आज शिवसेनेतील जुन्या माणसांना काहीही किंमत राहिलेली नाही, एवढेच नाही तर शिवसेनेत मतदान घेतले तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीसुद्धा राहणार नाही अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

ट्वीटरवरुन निलेश राणेंनी ऊद्धव ठाकरेंना लक्ष केले आहे. दिवाकर रावते यांनी मराठी विद्यापिठाचा मुद्दा ऊपस्थित केला. महाविकासआघाडी सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेत ऊल्लेख असतांना आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री असतांना मराठी विद्यापिठासाठी अर्थसंकल्पात तरतुद का केली गेली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मृत्युनंतर वर गेल्यानंतर बाळासाहेबांनी काय केले असे विचारले तर मी काय सांगू? असे म्हणत ठाकरेंनाच धारेवर धरले आहे.

दिवाकर रावते यांच्या या मुद्दयांना धरुनच निलेश राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली. जुन्या माणसांची अवस्था शिवसेनेत ईतकी वाईट झाली आहे की, वर गेल्यावर बाळासाहेबांना काय ऊत्तर देऊ असे बोलण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे हे केवळ ३५ टक्के शिवसैनिकांचेच मुख्यमंत्री आहे. आतासुद्धा शिवसेनेत सर्व्हे किंवा मतदान केल्यास ऊद्धव ठाकरे मुख्यमंत्रीसुद्धा राहणार नाही अशी टीका केली आहे.

दरम्यान प्रशासकीय कामकाजात मराठी राजभाषा आहे, परंतू तरिसुद्धा तसे होतांना दिसत नाही. मुंबईमध्ये अनेक परप्रांतीय त्यांचे भवन बांधतात. मात्र मुंबईत मराठी भवनच नाही, तसेच अौरंगाबादचे नामांतरसुद्धा झालेले नाही हे सर्व दुर्दैव आहे. असेसुद्धा दिवाकर रावते यावेळी म्हणाले आहे.