कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करुन घ्यावी : बाळासाहेब पाटील

4

ज्या कोणाला कोरोची लक्षणे आढळल्यास त्यांनी न घाबरता तात्काळ रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करुन घ्यावी, असे भावनिक आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

प्रत्येक कोरोना बाधित रुग्णाला उपचार मिळाले पाहिजे, यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. कोरोना संसर्गाची पुढच्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

तसेच कोरोनाचा संसर्गाची लक्षणे असूनही काही रुग्ण पुढे येऊन तपासणी करत नाही, एका व्यक्तीमुळे आख्खेच्या आख्खे कुटुंब बाधित होत आहे. सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

या उद्घाटनप्रसंगी आमदार जयकुमार गोरे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, ‍‍‍शिवाजी सर्वगोड, पंचायत समितीच्या सभापती जयश्री कदम, संदीप मांडवे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकरी उपस्थित होते.