“शेतकरी अंदोलनात मेले नसते तर घरी मेलेच असते की,” भाजपच्या नेत्याची जीभ घसरली!

10

नविन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी ७८ दिवस ऊलटून गेले असतांनासुद्धा ठाण मांडून आहेत. शेतकरी आंदोलनावरुन आता विरोधकांनी केंद्रातील भाजप सराकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. मात्र यादरम्यानच हरीयाणा सरकारमधील कृषीमंत्री अाणि भाजपचे मंत्री जे.पी. दलाल यांची शेतकरी आंदोलनासंदर्भात प्रतिक्रिया देतांना जीभ घसरली. आंदोलनस्थळी आंदोलनादरम्यान गतप्राण झालेल्या शेतकर्‍यांबाबत त्यांना विचारले असता, वादग्रस्त विधान त्यांनी केले. “आंदोलनाच्या ठिकाणी मेलेले शेतकरी घरी असते तरिही मेले असते” असे विधान त्यांनी केले. यानंतर त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून प्रचंड टीका करण्यात आली. त्यानंतर मात्र दलाल यांनी सावरासावरी करण्याचा प्रयत्न केला आहे.

इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. तर आम आदमी पार्टीने दलाल यांचा आक्षेपार्ह विधान केले असल्याचा व्हिडिअो ट्वीट करत भाजपवर निशाना साधला आहे. हरीयाणामधील भिवनी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यानचा हा व्हिडिअो आहे.

दिल्ली सिमेवर आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या शेतकर्‍यांबद्दल त्यांना विचारले असता, “ईथे काय घरी काय ते मेले नसते का, लाख दोन लाखांत सहा महिन्यात दोनशे लोकं मरत नाही का? कुणी हृदयविकाराने मरतो, कुणी ताप आल्याने मरतो” असे दलाल यावेळी म्हणाले. त्यानंतर मात्र सोशल मिडयावरुनसुद्धा दलाल यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली.

“माझ्या विधानाल चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. तरिदेखील कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो.” अशी सावरासावरी दलाल यांनी केली.