रासायनिक खताची दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन उभारू; शिवसेना खासदाराचा इशारा

18

शेतकऱ्यांना लागणाऱ्या रासायनिक खत निर्मिती करणा-या सर्व कंपन्यांनी ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर अचानक सर्व रासायनिक खताच्या किंमती भरमसाठ वाढविल्या आहेत. या कंपन्यांनी केलेली खतातील मोठी दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्यासह एका शिष्टमंडळाने केली.

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना शिवसेनेच्या या शिष्टमंडळाद्वारे मंगळवारी(दि.18) एक निवेदन सादर केल्या गेले. त्याद्वारे सर्वसामान्य शेतकरी गेल्या काही वर्षापासून अक्षरक्षः अडचणीत आहे. अलिकडे लॉकडाऊनचा तडाखा शेतक-यांना बसतो आहे.

गहु, ज्वारी, चना, तूर आदी माल विकता आला नाही. अद्यापही अनेक शेतक-यांच्या घरी शेतमाल पडून आहे. त्याचे नुकसान होत आहे. अशा या स्थितीत रासायनिक खताच्या कंपन्यांनी प्रतिबँग तब्बल 600 ते 700 रुपयांची वाढ केली. ती खताची ही दरवाढ केंद्र सरकारने तातडीने मागे घ्यावी.

जुन्या दरानेच तेच मुबलक प्रमाणात खत उपलब्ध करून द्यावा, असे खासदार संजय जाधव, गंगाप्रसाद आनेराव, प्रा.पंढरीनाथ धोंडगे, अतुल सरोदे, अर्जुन सामाले यांच्यासह एका शिष्टमंडळाने केली. दर वाढ मागे न घेतल्यास प्रखर आंदोलन उभारू, असा इशारा ही दिला.