महाराष्ट्रातील आघाडीचा पक्ष शिवसेनाबाबतीत अनेक वेळा आक्रमक होऊन त्यांची भूमिका मांडताना दिसत आहे. सध्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
मी काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवेदने पाहिली आहेत. बेळगावला महाराष्ट्रात आणायचे ही त्यांची भूमिका आहे. पण सर्वात आधी तिकडच्या मराठी नागरिकांना संरक्षणाची गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
बेळगाव हा या देशाचा भाग आहे. आम्ही मराठी माणसे तिकडे जायचे म्हटले की आम्हाला बंदुका दाखवतात. आमच्याकडे बंदुका नाहीत का? असही सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
काल बेळगावात शिवसेनेच्या एका जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यावरून वाद चिघळल्यानंतर दोन्ही राज्यातील बस सेवा बंद करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.