महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अद्यापही चिंताजनकच आहे. आज कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही ठिकाणी अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सध्या कोरोची परिस्थिती अतिशय भयावह बनत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा माजी खासदार आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.
कोकणाचे आमदार म्हणतायत मोठ्या हॉस्पिटलची कोकणात गरज नाही. असे विद्वान जोपर्यंत कोकणात निवडून येतील तोपर्यंत कोकणी लोकांचं काही खरं नाही. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांवर आमदारांना घाम फुटला कारण कधी काही केलंच नाही, काम केलं असतं तर चोख उत्तर देऊ शकले असते. असं म्हणतानाच एक व्हिडीओ व्हायरल करत राणे यांनी कोकणातील शिवसेनेच्या आमदारांना लक्ष केले आहे.
आज रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मात्र कोकणातल्या राष्ट्रवादी काँग्रेस-सेनेचे आमदार, खासदार जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. पत्रकार परिषदेत पत्रकारानी आरोग्य सुविधावर विचारलेल्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस-सेनेचे आमदार यांच्यात तू तू…मैं मैं करत बोलती बंद झाली. भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदार संघात तर आरोग्याच्या सोयीसुविधा अभावी आजारी पडलेले असतानाच कोरोना रुग्णांचे मृतदेह नेण्यासाठी शहवाहिनी देखील नसल्याचे समोर आले आहेत.
फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे गुणगान गाणारे जाधव मतदार संघासाठी कधी काम करणार असा प्रश्न त्यांच्या मतदारसंघातुन उमटत आहे. रत्नागिरी जिल्ह्याला लुटायची काम केली आणि दिवाळखोरीत नेला. मतदारसंघात काम केलं असत तर राष्ट्रवादी काँग्रेस-सेनेचे आमदार पत्रकारांना चोख उत्तर देऊ शकले असते असे राणे यांनी ट्विट द्वारे आपली प्रतिक्रिया मांडली आहे.