आज जर राजेशाही असती तर ‘त्या’ सगळ्यांना हत्तीच्या पायदळी तुडवल असतं

23

राज्यभर दिवसेंदिवस कोरोना रुग्नसंख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊनचे हत्यार उपसले आहे. मात्र, टाळेबंदी विरोधात राज्यभरात रोष व्यक्त होत आहे. आता राज्य शासनाने आणखी कडक निर्बंध घालण्याचे संकेत दिले आहेत.

आत्तापर्यंत अनेकांनी लॉकडाऊन विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यातील पोवईनाक्यावर लॉकडाऊनविरोधात हटके आंदोलन केलं. हातात कटोरा घेऊन ते फुटपाथवर बसले होते. या प्रतिकात्मक आंदोलनावेळी उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

उद्यापासून नो लॉकडाउन असे म्हणून ‘आज जर राजेशाही असती तर पैसे खाणाऱ्या सगळ्यांना मी हत्तीच्या पायाखाली तुडवल असतं.’ असंही यावेळी उदयनराजेंनी बोलून दाखवलं. यावेळी उदयनराजे भोसले यांनी विविध मुद्द्यांवर बेधडक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

यावेळी उदयनराजे म्हणाले की, मी दुकानदार किंवा व्यापाऱ्यांच्या बाजूने नाही बोलत, मी सर्वसामान्यांच्या बाजूने बोलत आहे. तुम्ही सगळं बंद तुम्ही केलं . उपासमारी तुम्ही आणली. तुमच्या बापाची इस्टेट आहे. लॉकडाउनमुळं तुम्ही त्यांना भीकेला लावणार का? असा संतप्त सवाल उदयनराजेंनी प्रशासनाला केला आहे.