कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सत्तेचा वापर करून १० ते १५ कोटींचा घरफाळा न भरता महापालिकेवर दरोडा टाकला आहे. असा आरोप भाजप नेते धनंजय महाडिक यांनी केला आहे.
पालकमंत्री यांच्या ड्रीम वर्ल्डच्या घरफाळ्याचे शून्य बिल कसे? याची वसुली करण्यात यावी. १ कोटीहून अधिक घरफाळा भरलेला नाही. याचे झिरो बिल कसे होते? येथे वापर कमर्शियल होत असताना शून्य बिल कसे ? असा सवाल महाडिक यांनी केला.
दरम्यान येत्या आठ दिवसात संबंधितांनी घरफाळा भरला नाही तर आपण महापालिकेसमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
महापालिकेकडून घरफाळा आणि पाणीपट्टीत वाढ होत आहे. तूट असल्याचे कारण सांगून वाढ केल्याचे सांगितले जात आहे. परंतु १५ ते २० हजार मिळकती अशा आहेत की, त्यांचा घरफाळा शून्य दाखविला आहे.असेही महाडिक म्हणाले.
१ कोटीहून अधिक घरफाळा भरलेला नाही. याचे झिरो बिल कसे होते? येथे वापर कमर्शियल होत असताना शून्य बिल कसे ? असा सवाल महाडिक यांनी केला.