‘आम्ही अजित पवारांना मुत्र्या म्हणालो तर राष्ट्रवादी वाल्यांना ते आवडणार नाही’

382

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा चंपा असा उल्लेख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पंढरपुरातील शिवाजी चौकात झालेल्या सभेत केला होता. अजित पवार हे चंद्रकांत पाटील यांचा चंपा असा उल्लेख वारंवार करत असतात. आता याच मुद्द्यावरून भाजप नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे.

भाजपचे नेते निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली असून इशारा दिला आहे. आम्ही अजित पवारांना मुत्र्या म्हणालो तर राष्ट्रवादी वाल्यांना ते आवडणार नाही.

म्हणून अजित पवारांनी आमच्या नेत्यांबद्दल बोलताना विचार करून बोलावं, नाही तर सगळ्यांना माहीत आहे आम्ही काहीही बोलू शकतो असा इशारा राणेंनी पवारांना दिला आहे.

यासर्व प्रकरणावर स्वतः चंद्रकांत पाटील यांनीही हरकत घेऊन अजित पवारांना सक्त ताकिद दिली आहे. चंपा म्हणणं थांबवा अथवा मलाही तुमच्या नेत्यांचे शॉर्ट फॉर्म बनवावे लागतील असं त्यांनी म्हटलं होतं.