जेष्ठ नागरीक आहात, तर करोनासंदर्भातील ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

6

जेष्ठ व्यक्ती किंवा ईतर काही व्याधी असणार्‍यांवर कोरोना हावी होतो, असे तज्ज्ञांचे म्हणने आहे. त्यादृष्टीनेच जपान, जर्मनीसारख्या राष्ट्रांनी वृद्धांची विशेष काळजी घेतली होती. भारतातसुद्धा अनेकठिकाणी जेष्ठ व्यक्तींच्या वावरावर निर्बंध आणले आहेत. कोरोना लसीकरणातसुद्धा जेष्ठ व्यक्तींना स्थान देण्यात आले आहे. या पार्श्वभूमिवरच जेष्ठ नागरीकांना १ मार्चपासून कोरोना लस देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. नुकतीच केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यांसंबद्धीची माहिती दिली आहे.

१ मार्चपासून ६० वर्षांवरील व्यक्तींना तसेच व्याधी असणार्‍या ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येणार असल्याचे सांगीतले आहे. १० हजार सरकारी आणि २० हजार खाजगी केंद्रांवर ही लसीकरण मोहीम पार पडणार आहे. लस ही सर्वांसाठी मोफत असून लसीकरणाचा संपूर्ण खर्च जेंद्र सरकार करणार असल्याचेसुद्धा जावडेकर यांनी यावेळी सांगीतले.

करोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकारकडून तीन सदस्यीय पथकं पाठवण्यात आली अाहेत. यामध्ये महाराष्ट्रासहित केरळ, गुजरात, पंजाब, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर या राज्यांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयातील सहसचिव-स्तरीय अधिकारी या पथकांचे नेतृत्व करत आहेत. रुग्ण वाढणार्‍या राज्यांना प्रथम लस देणार का? यावर स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

खाजगी रुग्णालयातून लस घेण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. अशी माहितीसुद्धा जावडेकर यांनी दिली. मात्र किती पैसे मोजावे लागतील याबाबत आरोग्य मंत्रालय निर्णय घेणार असे त्यांनी यावेळी सांगीतले. तसेच यासंबंद्धी लसनिर्मिती करणार्‍या कंपन्यांशी आमची चर्चासुद्धा सुरु असल्याचे ते म्हणाले.