“व्हॉट्सएपवर मेसेज फॉरवर्ड करतायत तर मग सावधान”, गृहमंत्र्यांनी दिला हा निर्वाणीचा ईशारा

35

कोरोना पुन्हा वेगाने पसरत आहे. अशावेळी प्रशासनाच्यावतीने अनेक निर्बंध लावण्यात येत आहे. मात्र काही लोक लॉकडाऊनसंदर्भातील अफवा सोशल मिडियाच्या सहाय्याने पसरवत आहे. अशांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दम दिला आहे. व्हॉट्सएप व अन्य माध्यमांवर सायबर सेलचे लक्ष असणार आहे. लॉकडाउनसंदर्भातील कुठलीही अफवा पसरवल्यास कारवाई करणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.

व्हॉट्सअप हे आता आपल्या जिवनातीलच एक भाग बनल्यासारखे आहे. सकाळच्या गुड मॉर्नींगपासून ते रात्रीच्या गुडनाईटपर्यंतचे अनेक मेसेज आपण एकमेकांना फॉरवर्ड करत असतो. यामध्ये अनेकदा काही घडामोडी, बातम्यांचासुद्धा समावेश असतो. परंतू आता जर तुम्ही व्हॉट्सअपवरील मेसेज काळजी न घेता फॉरवर्ड केले तर तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा वेग वाढतो आहे. अशावेळी लोक आलेल्या मेसेजेसची चाचपडताळणी न करताच तो फॉरवर्ड करतात. लॉकडाऊनविषयीची कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय सोशल मिडियावर अफवा पसरवल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याकरिता सायबर सेलची करडी नजर असणार आहे.

अफवा पसरवल्यामुळे नागरीक गोंधळुन जातात. अनेकठिकाणी निर्बध लावण्यात येत आहे. मात्र काही लोक लॉकडाऊनबाबत अफवा पसरवत आहेत. अफवा पसरवण्यांवर यापुढे सायबर सेलचे लक्ष असणार आहे. त्यामुळे मेसेज फॉरवर्ड करतांना सावधानता बाळगण्याचे अावाहनसुद्धा त्यांनी केले आहे.