केंद्रावर गेलं की लगेच लस मिळणार नाही; कोविन ॲपवर ऑनलाईन बुकींग करा…

22

राज्यात लसीकरण मोहिमेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. यातच राज्य सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र असे करताना लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होणार नाही याची दक्षता देखील आरोग्य विभागाने घेतली आहे.

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण केंद्रावर जावून लगेचच लस दिली जाणार नाही. केवळ कोविन ॲपच्याच माध्यमातून ऑनलाईन बुकींग मिळाल्यावरच लस मिळू शकेल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

अजूनही राज्य सरकारकडे पुरेशा लससाठा आलेला नाही. ही परिस्थिती देशातील सर्वच राज्यांची आहे. त्यामुळे १ मे रोजी सर्वच राज्यात लसीकरण सुरू होईल, यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र राज्य सरकार लसीकरण करण्यासाठी सकारात्मक आहे असे राजेश टोपे यावेळी म्हणाले.

राज्यात बेड्सचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी जिल्ह्यातील कलेक्टर्संना बेड वाढविण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. तसेच मनुष्यबळ, औषधे याचाही तुटवडा होता कामा नये असेही आदेश सर्व जिल्हा रुग्णालयांना देण्यात आले आहेत. दररोजच्या उपचारांसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा सरकारी रुग्णालयात झालेला आहे तसेच खासगी रुग्णालयांनी देखील हे उपलब्ध करावे, असे टोपे म्हणाले.