कोरोना ऊपचाराचा प्रोटोकॉल पाळला गेला नाही तर काही समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे यासंबधीच्या सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन केले जावे असा आमचा प्रयत्न आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांंनी सांगितले.
टोपे त्यांच्या साखर कारखान्याच्या कामासाठी साखरसंकूलमध्ये आले होते.म्युकरमायक्रोसिसच्या रुग्णांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू असलेल्या रुग्णालयात उपचार घ्यावेत.असे 131 हॉस्पिटल आहेत, इथं उपचार मोफत आहेत” असं टोपे म्हणाले.
इंजेक्शनचा सर्व कंट्रोल हा केंद्राकडे आहे, केंद्र महाराष्ट्राच्या झोळीत जितके इंजेक्शन देत त्याप्रमाणे वाटप होत.इंजेक्शन उपलब्ध होण्यात अडचणी असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक त्रास होतो” असंही टोपे यांनी स्पष्ट केले.
तसेच प्रत्येक बिल चेक करा असे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. हॉस्पिटल बाबत तक्रार असेल तर थेट माझ्याकडे तक्रार करा असा देखील टोपेनी स्पष्ट केलं आहे.