‘हिम्मत असेल तर एकटे लढा’ : भाजप नेता

13

पुणे आणि नागपूर पदवीधर हे हक्काचे मतदारसंघ आता महाविकास आघाडीकडे गेले आहेत. भाजपचा येथे पराभव झाल्याचं जवळपास निश्चित आहे. पुणे पदवीधर आणि नागपूर पदवीधर हे हक्काचे मतदारसंघ भाजपाच्या ताब्यातून आता महाविकास आघाडीच्या ताब्यात गेले आहेत.

पुणे मतदारसंघात महाविकास आघाडीचे अरुण लाड तर नागपूर नागपूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या संयुक्त आघाडीने महाराष्ट्रातील पदवीधर मतदार संघात मोठे यश खेचून आणले आहे. तर भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे.

पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा गमावल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला एकट एकट लढून दाखवण्याचे आव्हान दिलय. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे खच्चीकरण झाल असून राष्ट्रवादीने दोन्ही पदवीधर मतदार संघात आपले संघटन मजबूत केल्याचेही त्यांनी म्हटले. एकाप्रकारे शिवसेनेला त्यांनी इशारा दिला आहे.