सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला रद्द केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर मराठा समाजातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. समाजातील अनेकांच्या उद्विग्न प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी लाइव्ह संवाद साधला आहे. केंद्र सरकारने मराठा आरक्षण घालावे प्रश्नात लक्ष घालावं असं मत उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट आव्हान लाइव्ह सावंदाच्या माध्यमातून दिलं.
‘पंतप्रधानांनी काश्मीरचं 370 कलम हटवताना जी हिंमत दाखवली. तीच हिंमत आणि संवेदनशीलता आम्हाला आता पाहिजेय,’ असं विधान ठाकरेंनी केलं असून केंद्र सरकारला या संदर्भात एक पत्र लिहून मागणी करणार असल्याचंही ठाकरे म्हणाले आहेत.
यासर्व मुद्द्यांवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘प्रत्येक गोष्ट पंतप्रधान मोदींवर ढकलायची असेल तर तुम्ही घरी बसून खुर्ची कशाला उबवताय मुख्यमंत्री महोदय? तोंड काळे करा आणि बसा घरी निवांत, कडी लावून.’ अशा तिखट शब्दांत समचार भातखळकर यांनी घेतला आहे.