ताकद पाहायची असेन तर …… संभजीराजे छत्रपतींचा नारायण राणेंवर पलटवार

39

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापते आहे. दरम्यान संभाजीराजे छत्रपती मराठा समाजाचे नेतृत्व करीत असून कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाल न्याय मिळावा ही त्यांची भूमिका आहे. या भूमिकेला अनूसरुन ते सत्ताधारी आणि विरोधक दोघांवरसुद्धा टीका करीत आहे. मात्र यादरम्यानच भाजपचे नेते नारायण राणे यांनी संभाजीराजे छत्रपतींवर टीका केली.

खासदारकीचे दिवस संपत आले असल्यामुळे संभाजीराजे हे सर्व करत असावेत असा टोला राणेंनी लगावला. शिवाय सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेऊन आणि जिल्ह्यांचे दौरे करुन काय साध्य करणार? मुळात जनता तुमच्या पाठीशी आहे का? असे सवाल राणेंनी केले.

यांस प्रत्युत्तर देत संभाजीराजे छत्रपती नारायण राणेंवर चांगलेच संतापले. छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर समाजाला न्याय मिळवून देणे आहे. आमची ताकदच बघायची असेल तर ती योग्य वेळी आम्ही दाखवुन देऊ अशा आशयाचे ट्वीट संभाजीराजेंनी केले आहे.

सध्याच्या परिस्थितीत माझ्यासाठी लोकांचा जीव महत्वाचा आहे. मी शिवशाहुंच्या विचारांचा आहे. मुळात संभाजीराजे हे भाजपचेच खासदार आहे. आणि भाजपच्याच नेत्यांकडून त्यांच्यावर करण्यात येणार्‍या या टीकांमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.