कामाच्या सोयीसाठी बाहेर राहायचेच असेल तर आई-वडिलांना सोबत घेऊन राहा: मंत्री हसन मुश्रीफ

10

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती आदेश देण्याच्या कार्यक्रमात आई-वडिलांचा सांभाळ दैवत म्हणून करा. प्रमाणिकपणाने त्यांची सेवा करा. तसेच कामानिमित्त बाहेर राहायचे असेल तर, त्यांना सोबत घेऊन राहा. असे भावनिक आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सभेत बोलताना केले.

मृत नोकरदारांच्या वारसदारांना अनुकंपा तत्त्वावरील नोकरी तातडीने मिळेल यासाठी योग्य ते बदल करण्याची कार्यवाही करू. घरातील नोकरीत असलेला कर्ता पुरुष किंवा महिलेच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबावर कुऱ्हाड कोसळत असते. त्यामुळे मोह, लोभापासून बाजूला राहा. प्रामाणिकपणे सेवेत कार्यरत राहावे,असेही ते म्हणाले.

ही सभा कोल्हापूर शासकीय विश्रामगृह परिसरातील राजर्षी शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज पाटील ही उपस्थित होते. अनुकंपाची ही नोकरी म्हणजे आईच कुंकू पुसल्यामुळे मिळालेली ही नोकरी आहे. त्यामुळे आईची परवड होऊ देऊ नका. आईची जीवापाड काळजी घ्या. नोकरी करणाऱ्या कर्ता पुरुष किंवा स्त्री जाण्याने निराधार झालेल्या कुटुंबातील वरसदाराला तातडीने अनुकंपा नोकरी मिळण्यासाठी आपण आणि मंत्री मुश्रीफ सामान्य प्रशासनाशी बोलून योग्य ती कार्यवाही करू असेही मंत्री सतेज पाटील म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग तात्या पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष ए.वाय पाटील, महिला व बालकल्याण सभापती डॉ.पद्मारणी पाटील, समाज कल्याण सभापती सौ. स्वाती ससाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अमन मित्तल आदी प्रमुख उपस्थित होते.