रिक्त पदांच्या भरतीबाबत तातडीने कार्यवाही केली जाणार: धनंजय मुंडे

63

सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांच्या उपस्क्षितीत समाज कल्याण कर्मचारी गट (क) संघटनेची बैठक मुंबइत पार पडली.पदे भरण्याबाबत शासन निर्बंध उठल्यानंतर पदांच्या भरतीबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. 

सामाजिक न्याय विभागामधील कामकाज कौतुकास्पद असून, कामाकाजाच्या अनुषंगाने प्रत्येक कर्मचा-याने स्वत:ची कौशल्य आणि कार्यक्षमता वाढवून प्रत्येक नागरिकांना न्याय देणे आवश्यक आहे.सामाजिक न्याय विभागाकडून योजनेचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांना मिळण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकदिलाने काम केले पाहिजे.

पदधारकांना जबाबदारी त्याच प्रमाणे त्यांच्या सन्मानामध्ये वाढ करणे, त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे यासाठी एक प्रणाली तयार करण्यात येत असल्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. नारनवरे यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाच्या कालावधीमध्ये सामाजिक न्याय विभागाने केलेल्या कामाचे कौतुक केले. प्रलंबित राहिलेली सर्व कामे तसेच विविध स्तरावरच्या पदोन्नत्या, प्रशिक्षण विभागीय परीक्षा नजीकच्या कालावधीत पूर्णत्वास आणल्या जातील, असे मुंडे यांनी सांगितले.