मुंबई मॉडेल आसपासच्या महापालिकेत राबवा : मुंबई हायकोर्टाचा आदेश

4

मुंबई लोकसंख्या इतर शहरांच्या तुलनेत जास्त असतानाही गेल्या आठवड्यापासून सातत्यानं कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.मुंबई हायकोर्टानं महापालिकेच्या नियोजनाचं कौतुक केलं आहे.

महापालिकेच्या उत्तम नियोजनामुळे आता कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. याचं सुप्रीम कोर्टाकडूनही कौतुक झालं आहे. त्यामुळे मुंबई मॉडेल राज्यात इतर ठिकाणी आणि मुंबईजवळच्या महापालिकांमध्ये राबविण्यात यावं”, असे आदेश खंडपीठानं दिले आहेत.

मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं कोरोना व्यवस्थापनाबाबतीतील याचिकांवर एकत्रित सुनावणी देताना मुंबईतील कोरोना परिस्थिती आता नियंत्रणात येत असल्याचा दाखला दिला.