CBSC बोर्डाच्या परीक्षाबाबत शिक्षण मंत्र्यांची महत्वाची घोषणा

10

गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षांच्या तारखांबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशांक’ यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

शिक्षण मंत्र्यांनी सीबीएसईसह अनेक शिक्षा बोर्डात नवी शिक्षा नीती लागू करण्याच्या दिशेने काम सुरु केले आहे. सीबीएसई बोर्ड या दिशेने प्रेरणादायी ठरु शकते. नव्या शिक्षण नीतीचा रस्ता याच बोर्डाकडून जाईल, असं शिक्षणमंत्री म्हणाले आहेत.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 10 आणि 12 वीच्या परिक्षांची तारीख 2 फेब्रुवारीला जाहीर करणार असल्याची घोषणा केली आहे. निशंक यांनी यावेळी सीबीएसई विद्यार्थ्यांच्या 45 वर्षांच्या रिकॉर्डसना डिजिटलाईज केले.

रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी सांगितलं की, सीबीएसई 10 वी आणि 12 वी परीक्षांची डेटशीट 2 फेब्रुवारी 2021 ला जारी करण्यात येईल. सीबीएसई शाळांचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यासोबत व्हिडिओ कॉफ्रेंसिंगद्वारे चर्चा करताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

शिक्षण मंत्र्यांनी वेबिनारच्या माध्यमातून 1 हजारांपेक्षा अधिक स्कूलच्या प्रमुखांशी संवाद साधला. यात शैक्षणिक सत्र 2021-22 मधील पाठ्यपुस्तकं आणि शाळांच्या प्रक्रियायाबाबत चर्चा करण्यात आली.