मध्य रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय

6

मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार मुंबईतील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटांची विक्री तात्काळ बंद करण्यात येणार आहे.

मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट तातडीने बंद करण्यात आल्या आहेत. यात मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिन्स, कल्याण, ठाणे, दादर, सीएसएमटी या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

लोकल पूर्ण बंद करावी किंवा मागच्या वेळेस लोकल सेवेला जे निर्बंध होते ते घालावेत; यावर राज्य सरकारचा विचार सुरु आहे. त्यावर लवकरच विचार केला जाईल,” असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

कोरोना बाधितांचे प्रमाण 18.27 टक्के आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या 86 हजारांच्यापुढे गेली आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी एक महिन्यावर आला आहे.