उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजच्या (ता. 16) बैठकीत निर्णय घेण्यात आला. ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी या बाबत माहिती दिली. कोरोना संदर्भात आज अजित पवार यांनी उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला.
रेमडेसिविर इंजेक्शनसह इतरही काही बाबतीत तक्रारी येत असून, उपमुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आहे.या बाबत उपविभागीय अधिकारी तपासणी पथक नेमणार असून, प्रत्येक दवाखान्यांमध्ये जाऊन विविध बाबींची तपासणी हे पथक करेल.
बिलांचीही होणार तपासणी-खाजगी दवाखान्यांकडून रुग्णाला दिल्या जाणा-या बिलांचीही तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी या बैठकीत दिले. बिलांबाबत शासननिर्देश व दिली जाणारी बिले यांची पडताळणी काटेकोरपणे करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
दरम्यान, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय, रुई ग्रामीण रुग्णालय, शासकीय महिला रुग्णालयात आगप्रतिबंधक यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना पवार यांनी प्रशासनास दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.