कोरोना प्रतिबंधक लस तुटवड्याच्या पार्श्वभूमिवर मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

21

कोरोना संसर्गाला अाळा घालण्याचा एकमेव मार्ग हा लसीकरण आहे. परंतू गेल्या काही महिन्यांपासून आपल्याला कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा जाणवतो आहे. या प‍ार्श्वभुमिवरच मोदी सरकारने लसीकरणासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे.

येत्या काही दिवसांतच हैद्राबाद येथील बायोलॉजीकल-ई कंपनीची दुसरी भारतीय लस ऊपलब्ध होणार आहे. या लसीच्या दोन चाचण्या यशस्वी झाल्या असून तीसर्‍या टप्प्यातील चाचण्या सुरु आहे. दोन टप्प्यांमधील चाचण्यांचे निकाल ऊत्साहवर्धक असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे सरकारच्या आरोग्य खात्याने या लसीचे ३० कोटी डोस अगोदरच बुक करुन घेतले आहे. त्याकरिता १,५०० कोटीचा अॅडवान्स कंपनीला दिला जाणार आहे. शिवाय १०० कोटीचे अर्थसहाय्यसुद्धा कंपनीला सरकारकडून करण्यात आले आहे.

केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार अॉगस्ट ते डीसेंबर महिन्यांदरम्यान या लसींची साठवणुक केली जाणार आहे. तसेच जॉन्सन अॅंण्ड जॉन्सनच्या लसींचे ६०० दशलक्ष डोस ऊत्पादित करण्याचा करारसुद्धा बायोलॉजीकल-ई कंपनीसोबत करण्यात आला आहे.