अॉनलाईन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मुंबई महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय! सर्वत्र होतेय कौतुक

8

कोरोनामुळे असलेल्या टाळेबंदीचा शिक्षणावरसुद्धा प्रचंड परिणाम होतो आहे. अॉनलाईन शिक्षण त्याकरिता पर्याय असला तरिसुद्धा अनेकांना अॉनलाईन शिक्षण घेतांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे. हे नुकसान टाळबन्यासाठी मुंबई महापालिका विविधस्तरावर ऊपाययोजना करत असून एक महत्वपूर्ण निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे.

अॉनलाईन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना मुंबई महापालिकेकडून ५०० रुपय‍ांची आर्थिल मदत केली जाणार आहे. ज्याद्वारे विद्यार्थ्यांना ईंटरनेटचा रीचार्ज करणे सोयीस्कर होणार आहे.

मुंबई महापालिकांच्या शाळांत एकुण ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. यामधील सर्वाधीक विद्यार्थी हे निम्न मध्यनवर्गीय कुटुंबातले आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन तर आहे. परंतू ईंटरनेटच्या रीचार्जची पंचाईत आहे. याकरिताच मुंबई पालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना तीन महिन्याचा रीचार्ज करता येऊन अॉनलाईन शिक्षणाशी जुळता येणार अाहे.

नवे शैक्षणिक वर्ष सरु होणार आहे. तीसर्‍या लाटेचा धोका वर्तवण्यात आला असल्यामुळे शाळा सुरु होण्याच्या शक्यता कमीच आहे. त्यामुळे आता पुन्हा अॉनलाईन शिक्षणाकडेच मोर्चा वळवावा लागणार आहे. परंतू दरम्यान अॉनलाईन शिक्षणाच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांचे नुकसना होऊ नये याकरिता पालिकेने हा निर्णय घेतला आहे. अर्थातच हा अंतिम निर्णय नसून अधिक व्यापकस्तरावर विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या जातील असे मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यावेळी म्हणाले.