कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी- बारावीच्या परीक्षांबाबत महत्वपुर्ण निर्णय

16

राज्य सरकारने एमपीएससीची ११ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्याबाबत मागणी केली जात होती. 

अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य केली असून दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला आहे.दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्या, तरी सीबीएसईसारख्या इतर बोर्डाचं काय? असा देखील प्रश्न आहे. 

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवर यासंदर्भात माहिती देणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे.दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेमक्या किती तारखेला घेणार, याविषयी राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होतील. त्याअनुषंगाने नियोजन करून परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील”, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.