म्युकरमायकोसिस संदर्भात राज्याच्या आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

18

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे. म्युकरमायकोसिस संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

त्यासाठी लागणारी इंजेक्शन्स 31 मे नंतरच उपलब्ध होऊ शकतील. परिणामी पुढील 10 दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात येणार आहे. या आजारात लागणाऱ्या सर्व औषधांचा खर्चही या योजनेतून दिला जाणार आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.