गेल्या वर्षी दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परिक्षांवर काहीसे कोरोनाचे सावट होते. कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक वर्षच ऊशिरा सुरु झाले. थोडेफार नियमित होते ना होते तोवर पुन्हा कोरोनाने राज्यात डोके वर काढण्यास सुरुवात केली आणि पुन्हा शाळांना कुलुपं लागली. दरम्यान अॉनलाईन शिक्षण सुरु आहे. परंतू कोरोनाचे वाढते रुग्ण बघता बोर्डांच्या परिक्षांबाबत पालक आणि विद्यार्थी दोघांच्याही मनात प्रश्न होते. परंतू राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
दहावी आणि बारावीच्या परिक्षा नियोजित वेळेत आणि अॉफलाईनच होतील असे सांगीतले आहे. शैक्षणिक वर्ष ऊशिरा सुरु झाल्यामुळे दरवर्षी फेबृवारी – मार्चमध्ये होणार्या दहावी आणि बारावीच्या परिक्षा यंदा एप्रिल-मार्चमध्ये होणार आहे.
दहावीची परिक्षा २९ एप्रीलपासून सुरु होणार आहे. तसेच बारावीची परिक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान असणार आहे. प्रसारमाध्यमांशी बोलतांना वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.
आम्ही यासंबंद्धि खुप सार्या तज्ज्ञांशी बातचीत केली आहे. त्यानुसार परिक्षा ही ठरलेल्या वेळांत आणि अॉफलाईनच घ्यावी लागेल. कारण ही बोर्डाची परिक्षा आहे. आम्ही अॉगस्टमध्ये अभ्यासक्रम कमी करण्याच काम केलं आहे. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच नुकसान झालं आहे त्याचा आम्हाला विचार कारावा लागेल. असेही वर्षा गायकवाड यावेळी म्हणत होत्या.
नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षासंबंद्धि लवकरच निर्णय घेतला जाईल. मात्र या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राजणव गरजेचे आहे. कारण ईयता नववी आणि अकरावी हे पुढील वर्गासाठीचा पाया आहे. त्यामुळे अॉनलाईन का होईना परंतू शिक्षण चालु राहणे गरजेचे आहे. असेही शिक्षणमंत्री म्हणाल्या.