कारंजात तिथीनुसार शिवजयंती साजरी

14

महाराष्ट्रात ठिकठिकाणी तारखेसोबत तिथीनुसारदेखील शिवजयंती साजरी केली जाते. फाल्गुन वद्य तृतीय अर्थातच यावर्षिच्या ३१ मार्चला तिथीनुसार शिवजयंती होती. कारंजा शहरात बजरंग दलच्यावतीने ऊत्साहात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली.

दरवर्षी विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखा कारंजा यांच्यावतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. रीतीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. कारंजातील नेहरु चौकातील छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हारार्पन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी वेदपठन आणि मंत्रोच्चार करण्यात आला. त्यानंतर छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला.

दरवर्षी तिथीनुसार शिवजयंतीला बजरंग दलतर्फे कारंजातील समाजसेवकांकडून महारांजाच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात येतो. यावर्षि हा बहुमान वैकुंठ रथाची निशुल्क सेवा देणार्‍या ‍राजुभाऊ ठाकरे यांच्याहस्ते सपत्नीक अभिषेक करण्यात आला आहे.

दरवर्षी मोठ्या ऊत्साहात कारंजात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येत असते. परंतू यावर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे साधेपणाने शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यामुळे सर्व नियमांच्या अधिन राहुन शिवजयंती साजरी करण्यात आली आहे.