शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी “या” योजनेसाठी जाहीर करण्यात आला ३८ कोटींचा निधी

45

राज्य सरकारच्या कृषी विभागातर्फे विभागाकडून राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण ऊपअभियानसाठी वर्ष २०२१-२२ करित‍ निधी मंजुर करण्यात आला आहे. कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाकरिता सरकारकडून ३८ कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. यापैकी १९ कोटींचा निधीचे वाटप करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत. सध्या आर्थिक विवंचनेत असणार्‍या शेतकर्‍यांसाठी ही दिलासादायक बातमी ठरणार आहे.

पारंपारीक अवजारांपेक्षा शेतकरी यंत्रांचा वापर मोठ्याप्रमाणात करतो आहे. शेतीतील यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्याकरिताच राज्य सरकारतर्फे कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबवण्यात येत. यामध्ये शेतकर्‍यांना यंत्र खरेदीसाठी शासनातर्फे अनुदान देण्यात येते. यामध्ये शेतकर्‍यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, शेतीमधील अवजारे, बैल चलित अवजारे, पक्रिया संच ई. अवजारांसाठी अनुदान देण्यात येते.

शेतकर्‍यांनी शेती करत असतांना जास्तीत जास्त तंत्रस्नेही व्हावे. यंत्रांचा वापर करुन शेतीमध्ये अाधुनिकता अाणत भरघोस ऊत्पादन करावे. अल्प- अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना शेतीआवश्यक यंत्र खरेंदीसाठी अनुदान प्राप्त करुन देणे. तसेच शेतकर्‍यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरण पोहचविणे हा या याजनेमागील मुळ उद्देश आहे.

https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाईटवर अर्ज करुन शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. ७/१२ ऊतारा व ८ अ चा ऊत‍ारा असणारे शेतकरी या योजनेसाठी लाभार्थी असणार आहे. अनुसुचित जाती आणि जमातीमध्ये येणार्‍या शेतकर्‍यांनी जातीचा दाखला लावणे आवश्यक आहे.