लॉकडाऊनसंदर्भात फडणवीसांचे महत्वाचे विधान! काय म्हणाले फडणवीस?

15

“लॉकडाऊन हा सर्वतोपरी ऊपाय होऊ शकत नाही. लॉकडाऊनमुळे व्यवहार थांबतात. परिणामी रोजगारावर गदा येते. लॉकडाऊन हा कोरोनाला नियंत्रणात अाणण्यासाठीचा ऊपाय होऊ शकत नाही. मात्र प्रशासनाने घेतलेल्या निर्णयासोबत आम्ही राहू” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नागपुर लॉकडाऊन केल्यानंतर पालकमंत्री नितीन राऊत यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

नागपुरात कोरोना संसर्गाने पुन्हा पूर्वीसारखा वेग घेतला आहे. त्यामुळे नागपुरमध्ये कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री नितीन राऊत यांनी यासंर्भात सर्वपक्षीय नेते व अधिकारी यांची महत्वाची बैठक बोलावली होती. बैठक आटोपल्यानंतर बाहेर पडत असतांना देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न केले असता त्यांनी लॉकडाऊनसंर्भात ही प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बैठकीत काय झाले याचा ऊल्लेख त्यांनी टाळला आहे. परंतू लॉकडाउनचा रोजगारावर परिणाम होतो. त्यामुळे कडक निर्बंधांसह सर्व व्यवहार सुरु ठेवायला हवेत. असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.