वाशिम जिल्ह्यात सुधारीत संचारबंदीचे आदेश लागू, आता रात्री ८ नंतर असणार संचारबंदी

9

वाशिम जिल्ह्यात नुकतेच संचारबंदीचे सुधारीत आदेश लागू करण्यात आले आहे. आदेशानुसार आता रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी असणार आहे. यापुर्वी सायंकाळी ५ वाजतापासून ते सकाळी ९ वाजेपर्यंत संचारबंदी होती. सुधारीत आदेशानुसार संचारबंदीचा कालावधी कमी केल्यामुळे छोटे-मध्यम व्यवसायिकांत काहीशा प्रमाणात आनंदाचे वातवरण आहे.

संचारबंदीच्या वेळेत वाढ केली असली तरि निर्बंध मात्र कायम आहेत. संचारबंदीदरम्यान चारपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सर्व आस्थापने व दुकाने व ईतर‍ांनासुद्धा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. आदेशांचे ऊल्लंघन केल्यास स्थानिक प्रशासनास कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी दिले आहे.

लग्नसमारंभ व अंत्यविधीबाबतचे निर्बंध कायम आहेत. लग्नसमारंभास ५० तर अंत्यविधीस २० व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. गृह विलगीकरणाससुद्धा स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.

गेल्या तीन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्येत घट होत असल्याचे चित्र आहे. ३०० च्या वर असणारा आकडा हळूहळू कमी होतो आहे. परंतू संकट अद्यापही टळलेले नाही. त्यामुळे योग्य काळजी घेणे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.