2020 संपला आता नवीन वर्षाला सुरवात झाली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाला अनेकांनी मोठ्या उत्साहाने सुरूवात केली आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी नव्या वर्षाचे जल्लोषाने पार्टी करत स्वागत केले आहे. लॉकडाउन असल्याने आणि रात्री 11 ते 6 जनता करफ्यु असल्यामुळे कुणी बाहेर गेले तर कुणी घरीच एन्जॉय केलं. बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतने मात्र पार्टी न करता घराची साफ-सफाई करणं जास्त पसंद केले आहे. याचा फोटो तिने तिच्या अकाउंटवर शेअर केला आहे.
कंगना रनौत नेहमीचं आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. नुकतीच ती मुंबईमध्ये सिद्धीविनायकच्या दर्शनाला गेली होती तेव्हा जय महाराष्ट्र असेही उद्गारही केले होते. २०२० वर्षाच्या शेवटच्या दिवशी कंगना रणौतने तिचे वार्डरोब आणि घर स्वच्छ करण्यात बिझी होती. कंगनाने तिचं कॅबिनेट स्वच्छ करतानाचा फोटो शेअर केला आहे.
या फोटोसोबत तिने कॅपशनदेखील लिहिले होते की, ‘जेव्हापासून मी घरी परतली आहे तेव्हापासून फक्त सफाईच करत आहे. असे म्हणतात की, ज्या वस्तू तुमच्या असतात, त्यांच्या तुम्हीही असता. आशा आहे की, आज माझं काम संपेल आणि २०२१ मध्ये मी एका क्वीनसारखी एन्ट्री घेईन’. कंगना रणौत काही दिवसांपूर्वी मुंबईला परतली आहे. तिच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच ‘धाकड’ सिनेमाचं शूटींग सुरू करणार आहे. त्यासोबतच कंगना ‘थलायवी’ आणि ‘तेजस’ सिनेमात देखील दिसणार आहे.