बारामती शहरात कोरोना चा प्रदुर्भाव चांगलाच वाढत आहे. यामुळे बारामती नगरपालिका प्रशासन सज्ज झालं आहे. आज पासून बारामती शहरातल्या सव्वालाख लोकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्याची मोहीम बारामती नगरपालिकेने हाती घेतली आहे.
बारामतीमधील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त करून प्रशासनाला कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणेबाबत निर्देश केले आहेत.
त्याच अनुषंगाने आज नगरपरिषदेमध्ये ४५० लोकांचे पथक तयार करून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याची माेहीम हाती घेण्यात आली आहे. यात प्रामुख्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या प्रभावी अंमलबजावणी व्दारे कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्ती शोधून त्यांची तपासणी संख्या वाढविणे, प्रतिबंधित क्षेत्रात आणि सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे निर्जंतुकीकरण करणे, शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी कोविड लस घ्यावी याकरिता जनजागृती करणे अशा उपाययोजना तातडीने करण्याचे सुरू आहेत.