बारामती:लॉकडाऊनला सर्वांचाच तीव्र विरोध असल्याने लॉकडाऊनकडे प्रशासनही तितक्या गांभीर्याने पाहत नाही, निर्बंध अधिक कडक करावेत की काय या दृष्टीने चर्चा सुरु आहे.बारामती शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्या कमी होत नसल्याने आता सर्वांचीच झोप उडाली आहे.
काल बारामतीत तपासलेल्या 649 रुग्णांपैकी तब्बल 197 जण पॉझिटीव्ह सापडल्याने आज पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. नागरिकांनीच काळजी घेऊन कोरोनाग्रस्त होणार नाही या दृष्टीने प्रबोधन करण्याचा प्रयत्न या पुढील काळात होणार आहे.
बारामतीची आजची (ता. 2) स्थिती…
• कालचे (ता. 1) एकूण तपासलेले नमुने 649
• एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-197
• शहर-117 ग्रामीण- 77.
• एकूण रूग्णसंख्या-9753
• बरे झालेले रुग्ण- 8142
• एकूण मृत्यू– 165.
नर्सिंग वसतिगृहात ऑक्सिजनची सुविधा असलेले 70 बेडस तयार करण्याचे काम सुरु झाले असून येत्या काही दिवसात हे काम वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे व ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी सांगितले.