पाच वर्षांत भारत जगातील वाहनांचे अव्वल उत्पादन केंद्र होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. नितीन गडकरींनी एका वेबिनारला संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते.
नितीन गडकरींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. एमएसएमई घटकांना भांडवलाच्या बाजारात प्रवेश करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. वाहन भंगार पॉलिसीमुळे गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. भारतात वीज निर्मितीची मोठी क्षमता असल्याचे मंत्री म्हणाले.
“नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपण नवीन बाजारपेठ तयार करणार आहोत, अधिक नफा कमवू आणि अधिक रोजगार निर्माण करणार आहोत,” असंही एमएसएमएमई आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी म्हणालेत.
देशातील अक्षय ऊर्जा स्त्रोतांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, अशी माहिती सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे .